Dighi news: राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी

ही बातमी शेअर करा.

Dighi news: राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी
Pckhabar- दिघी विकास मंचच्या वतीने भोसरी येथील लांडेवाडी चौकात राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मंचाचे माजी अध्यक्ष वसंत रेंगडे म्हणाले, ”छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. परंतू हे स्वराज्य स्थापण करण्यासाठी आई म्हणून जिजाबाईंनी दिलेली प्रेरणा मोठी होती. या प्रेरणेतूनच रयतेचे राज्य उदयाला आले. औरंगजेबासारख्या बलाढ्य शक्तीपुढे रयत खंबीरपणे उभा राहू शकली. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली. या ताकदीची पायाभरणी संस्कार आणि शिक्षण यांच्या रूपात जिजाबाईंनी केली होती”. अशा शब्दांत त्यांनी जिजाऊं बद्दलच्या स्मृतींना उजाळा दिला.

यावेळी मंचाचे कार्याध्यक्ष योगेश अकुलवार, सचिव समाधान कांबळे, खजिनदार दत्ता घुले, सहसचिव अभिमन्यू दोरकर, पी. एन. म्हेत्रेसर सुनिल काकडे, संजय गायकवाड, रमेश विरणक, भाग्योदय घुले, प्रतिभा दोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सचिव समाधान कांबळे त्यांनी केले तर आभार दत्ता घुले यांनी मानले.


ही बातमी शेअर करा.