Delhi news: केंद्र सरकारला झटका; कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Pckhabar- सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत अखेर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून नवीन तिन्ही कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली असून समितीचे गठण केले आहे. या समितीत चार जण असल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने कडक शब्दात केंद्राला सुनावलं होतं. ते म्हणाले की, कोर्टाकडून तयार केलेल्या समितीमध्ये चर्चा होईपर्यंत हा कायदा होल्ड करायला हवा. अन्यथा कोर्टाकडून हा कायदा रोखण्यात येईल.
त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयाने नवीन तिन्ही कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे.










Leave a Reply