Pune news: कैकाडी समाजाच्या उद्योग मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ; उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी एस.एल. गायकवाड

Pune news: कैकाडी समाजाच्या उद्योग मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ; उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी एस.एल. गायकवाड

Pckhabar-कैकाडी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उद्योग मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी एस.एल. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.

पुणे येथील अल्पबचत भवन येथे हा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी एस.एल. गायकवाड यांची उद्योग  समूहातील सर्व सदस्यांचा सहमतीने करण्यात आली. 

भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीचे राष्ट्रीय प्रभारी तापणकुमार रॉय यांचा हस्ते मानवाधिकार पार्टीचा महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून एस. एल. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मानवाधिकार पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नारायण गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना
मानवाधिकार पार्टीचे राष्ट्रीय महासचिव सिद्धार्थ साखरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. 

याप्रसंगी टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव, उद्योगपती काशीनाथ जाधव, उद्योगपती बापूसाहेब जाधव, कोयना ताई, सतीश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी केले.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *