Pune news: गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात ‘कोविशील्ड’ लसीचे तीन कंटेनर रवाना

Pune news: गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात ‘कोविशील्ड’ लसीचे तीन कंटेनर रवाना

Pckhabar-सिरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनरपैकी तीन कंटेनर पुणे विमानतळाच्या दिशेने पोलिस बंदोबस्तामध्ये 4 वाजून 55 मिनिटांनी रवाना झाले आहे. तर यापुर्वी इन्स्टिट्यूट च्या परिसरात कंटेनरची पूजा परि मंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते हार घालून आणि नारळ फोडून करण्यात आली. तर यावेळी कंटेनर रवाना होताना. गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा कर्मचाऱ्यांनी दिल्या आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.

पुणे विमानतळावरून पहिले विमान दिल्लीसाठी सकाळी 8 वाजता रवाना झाले आहे. 8 फ्लाईटपैकी 2 फ्लाईट कारगो असून यातील कारगो फ्लाईट पैकी एक हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर, तर दुसरी कोलकता आणि गोवाहाटी येथे जाणार आहे.
पुणे विमानतळावरून कोविशील्ड लसीचे देशभरातील 13 शहरांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या भागात जाणार आहेदेशात प्रत्यक्ष लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *