Maharashtra news: चिकन, अंडी खाणाऱ्यांसाठी पशुसंवर्धन मंत्र्यांचा सल्ला

Maharashtra news: चिकन, अंडी खाणाऱ्यांसाठी पशुसंवर्धन मंत्र्यांचा सल्ला
Pckhabar- महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने राज्य सरकार सावध झाले आहे.  तर बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे.

मंत्री केदार म्हणाले, राज्यात फक्त परभणीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचं आढळून आलं आहे. राज्यात इतरत्रं बर्ड फ्ल्यू झाल्याचे अद्याप निदान झालेले नाही. त्यामुळे चिकन, अंडी खाऊ शकता. फक्त 70 ते 80 डिग्री तापमानावर अर्धा तास चिकन- अंडी शिजवा आणि त्यानंतर खा. अर्धा तास चिकन- अंडी शिजवल्यास त्यातील जीवाणू मरून जातात. हे मी सांगत नाही तर संशोधनातून तसे सिद्ध झाले आहे, असे केदार यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *