Pimpri news: पिंपरी-चिंचवडच्या विकासात चंद्रकांत पाटलांचे योगदान काय?

 

 

Pimpri news: पिंपरी-चिंचवडच्या विकासात चंद्रकांत पाटलांचे योगदान काय?
विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांचा सवाल
Pckhabar-पुणे शहराचे पालकमंत्री असताना पिंपरी-चिंचवड शहराकडे   ढुंकूनही न पाहिलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. राजशिष्टाचाराप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्या हस्ते प्रत्येक विकास कामाचे भूमिपुजन अथवा उद्घाटन त्यांच्या हस्ते करणे गरजेचे आहे. मात्र, या शहरासाठी काडीचेही योगदान नसलेल्या पाटील यांच्या हस्ते सोडणे काढणे म्हणजे हे केवळ द्वेषाचे राजकारण सुरू आहे, असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केला आहे.  

याबाबत मिसाळ यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केँद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आर्थिकृष्ट्या दुर्बल घटांसाठी चर्‍होली, बोर्‍हाडेवाडी व रावेत येथील नियोजित प्रकल्पांतील सदनिकांची सगणकीय सोडत सोमवारी 3 वाजता. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे. या प्रल्पाचे काम सरासरी 20 टक्क्यांपर्यंतच झालेले असून, सर्व प्रकल्प पूर्ण होण्यास किमान दिड ते दोन वर्षांचा कालावधी लागेल. त्यातच रावेत प्रकल्पाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. असे असताना सदनिकांची संगणकीय सोडतीची घाई सत्ताधारी भाजप पदाधिकारी का करीत आहेत ? शहरातील गोर गरीब जनतेला आशेला लावून ठेवण्याचा हा प्रकार आहे. महापालिकेचे सार्वजनिक निवडणुक एका वर्षावर आली असताना आम्हीच कसे जनतेच्या हिताची कामे करीत आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप पक्ष करीत आहे. मागील चार वर्षे अपवादात्मक एखादा प्रकल्प सोडल्यास एकही नाव घेण्याजोगा प्रकल्प सत्ताधार्‍यांनी राबविला नाही. त्यांच्या पक्षातील अंतर्गत मतभेदामुळे मागील चार वर्षांपासून एकमेकांवर कुरघोडी करण्यातच त्यांचा वेळ जात आहे. शहरातील प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागिल पाच वर्षांत मंजूर केलेले प्रकल्पांची उद्घाटने करून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पुणे शहरात विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस व उपमुख्यमंत्री अजित पवार या  दोघांच्याही हस्ते विकासकामामध्ये राजकारण नको, म्हणून एकत्र कार्यक्रम केला. परंतू, पिंपरी-चिंचवडची भाजपाचे नेते व्देषाचे राजकारण करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही भाजप सत्ताधार्‍यांची दादागिरी खपवून घेणार नाही.  शहरात ज्या-ज्या वेळी मनपाच्या विकास कामाचे भूमिपूजन अथवा उद्घाटन असतील त्या वेळी राजशिष्टाचाराप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते घेण्याबाबत आम्ही आग्रही राहू, अन्यथा सदर विकास कामाचे भूमिपूजन अथवा उद्घाटन आम्ही होऊ देणार नाही हे सत्ताधारी भाजपने लक्षात ठेवावे, असा इशारा मिसाळ यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *