Chinchwad news: शहरातील गुंडांचा बंदोबस्त करा : अजित पवार
Pckhabar- पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्ताल करण्यात आले. मात्र, आयुक्तालय करताना काही प्रमाणात घाई झाली आहे. त्यामुळे अनेक सुविधांचा अभाव आहे. पोलीस आयुक्तालयाला आवश्यक ती मदत करू. मात्र, शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीसांनी गुन्हेगारांना अजिबात पाठिशी न घालता त्यांचा बंदोबस्त करावा, अशा
सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिल्या.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आज शुक्रवारी पिंपरी-चिंचवड पोलीस विभागातर्फे पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या हस्ते ‘स्मार्ट वॉच’ आणि सायकलचे वाटप करण्यात. यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी महापौर माई ढोरे, आमदार सुनिल आण्णा शेळके, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, पिंपरी चिंचवडचे आयुक्तालय स्थापन करताना घाई झाली आहे. त्यामुळे आयुक्तालयाला चांगली इमारत नाही, मैदान नाही, मोटारी नाहीत, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तीनच दिवसापूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयाला आणि ग्रामीण भागासाठी निधी दिला आहे. त्याचप्रमाणे पिंपरी आयुक्तालयाला ही निधी दिला जाईल. पुणे जिल्हा परिषदेची इमारत जशी सुसज्ज आहे, त्याप्रमाणे आयुक्तालयाचीही इमारत बांधली जाईल.
पोलिसांनी गुन्हेगारांना पाठिशी न घालता त्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशा सुचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या.











Leave a Reply