Sangvi news: महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी संक्रांतीनिमित्त उत्पादन प्रदर्शन

ही बातमी शेअर करा.


Sangvi news: महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी संक्रांतीनिमित्त उत्पादन प्रदर्शन
Pckhabar- सांगवी परिसर महेश मंडळ (महिला समिती) पुणे यांच्या वतीने महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी संक्रांतीनिमित्त उत्पादन प्रदर्शन व विक्रीचे आयोजन माहेश्वरी चौक, नवी सांगवी जवळील मल्हार गार्डन येथे करण्यात आहे. यात 25 हुन अधिक स्टॉल्सवर महिला उद्योजकांकडून अनेक घरगुती वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते  महादेवाच्या मूर्तीस हार घालून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या स्टॉलमध्ये  सैंधव मीठ, लोणचे, खारे पदार्थ  तसेच, बेकरी पदार्थ, देवाची अलंकारिक वस्त्रे, साड्या, ड्रेस, मेणबत्त्या, इतर कपडे आणि अनेक घरगुती वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले होते. महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी स्थानिक नगरसेविका शारदा सोनावणे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी स्टॉल भेट देऊन खरेदी केली. कोविड 19 च्या संदर्भांतील सर्व नियम पाळले गेले.

पद्मा लोहिया, नम्रता नावंदर, गौरी नावंदर, श्रुती मंत्री, जमना राठी, कविता लढ्ढा इत्यादी महिला समितीतर्फे सुव्यवस्थेची जबाबदारी उचलली. या प्रदर्शनात महिलांचा उत्साह पाहून त्यांचे महापौरांनी कौतुक केले. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अश्या आयोजनाची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.


ही बातमी शेअर करा.