Maharashtra news: औरंगाबादचे नामकरण शंभूराजे नगर करा : अनिरुद्ध शेलार

 

Maharashtra news: औरंगाबादचे नामकरण शंभूराजे नगर करा : अनिरुद्ध शेलार
Pckhabar- गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन फक्त चर्चा सुरू आहे. सरकारने आता चर्चा न करता औरंगाबाद शहराचे शंभूराजे नगर करा, असे नामांतर करावे, अशी मागणी ‘आम्ही मराठा’ संघटनेचे संस्थापक अनिरुद्ध शिवाजी शेलार यांनी केली आहे.

औरंगाबाद शहराचे नामांतर करण्यावरून राजकीय नेते मंडळी आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत. भाजप, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नामांतराला पाठिंबा दिला आहे.

याबाबत pckhabar. Com शी बोलताना अनिरुद्ध शेलार म्हणाले, सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतराचा विषय चर्चेला जात आहे. अनेक नागरिकांसह सामाजिक संस्थांचे एकमत होत नाही.
कोणी बोलतंय संभाजीनगर करा,
कोणी बोलतंय छत्रपती संभाजी नगर करा, तर कोणी बोलतंय
छत्रपती संभाजी महाराज नगर करा. मात्र, मोठी नाव ठेवली तर काय होत याच उदाहरण बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोक त्याला CSMT म्हणतात, मग काय साध्य केलं आपण नामांतर करून?? मुळात शिवाजी, संभाजी या नावातच दरारा आहे, तरी ही तुम्हाला या नावात एकेरी उल्लेख वाटत असेल तर मग आपण शिवराय, शिवबा, शंभूराजे अस नाव वापरू शकत नाहीत का?? जर संभाजीनगर हे नाव मान्य नसेल तर शंभूराजे नगर असे नाव करावे. मोठे नाव ठेवल्याने नागरिक पुन्हा त्याला शॉर्टमध्ये बोलतात. त्यामुळे शंभूराजे नगर असे नामकरण करावे, अशी मागणी ‘आम्ही मराठा’ संघटनेचे संस्थापक अनिरुद्ध शिवाजी शेलार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *