Dehu news : सामाजिक बांधिलकी जोपासत 17 वर्षांपासून ‘अभंग प्रतिष्ठान’ कार्यरत

ही बातमी शेअर करा.

Dehu news : सामाजिक बांधिलकी जोपासत 17 वर्षांपासून ‘अभंग प्रतिष्ठान’ कार्यरत
Pckhabar- ‘करावे सायास आपुल्या हिताचे’, ‘ येथे आलियाचे मनुष्यपण’ या जगद्गुरु संत तुकोबारायांच्या अभंग वचनाचे ब्रीद वाक्य मनी बाळगून  देहूगाव येथील अभंग प्रतिष्ठान 17 वर्ष अविरतपणे समाजकार्य करत आहे. गोर-गरिबांना अन्नधान्य वाटप, कपडे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत अशा प्रकारे प्रतिष्ठानचे पदाधिकारी मदत करतात.

सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील वंचित, गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने देहूतील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी
4 जानेवारी 2004 ला अभंग प्रतिष्ठानची स्थापना केली. स्थापना झाल्यापासून प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी समाज कार्यात सतत अग्रेसर असतात.

17 वर्षांच्या प्रवासाबद्दल बोलताना अभंग प्रतिष्ठानचे सदस्य म्हणतात, ‘ झालेला सुंदर प्रवास अनेकांच्या अडचणी, सुख-दुःख यांच्याशी समरस होऊन अनेकांच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करीत माणुसकीचे नाते अखंड जपत आहे. विविध लोकहिताचे उपक्रम उभे करून एक  विधायक समाज परिवर्तनाची नांदी घडवीत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे सर्व शक्य होत आहे. आपल्या सर्वांचे प्रेम, सहकार्य व आशीर्वाद असेच सदैव आमच्या सोबत राहावे हीच आजच्या वर्धापन दिनानिमित्त प्रेमाची अपेक्षा.

अभंग प्रतिष्ठानच्या 17 व्या वर्धापनदिनानिमित्त  pckhabar.com . कडून  हार्दिक शुभेच्छा!!

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)


ही बातमी शेअर करा.