Pcmc news: महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बढती; बदली नाही
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सद्याच्या पदावर 1 जानेवारी 2021 पासून स्थानापन्न पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे हर्डीकर यांना आणखी काही दिवस महापालिकेतच ठेवू इच्छित आहेत. त्यामुळे आणखी तीन महिने आयुक्त हर्डीकर पालिकतेच राहण्याची शक्यता आहे.

आयुक्तांना बढती मिळाल्यानंतर बदली होईल असे मानले जात होते. आयुक्तांना बढती मिळाली. सद्याच्या पदावर स्थानापन्न पदोन्नती देण्यात आली आहे. सद्याचे पद भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकालिक वेतनश्रेणीत उन्नत करून पुढे चालू ठेवण्यात आले आहे. 1 जानेवारी 2021 पासून पदोन्नती देण्यात येत आहे. पण, बदली झाली नाही.
दरम्यान, श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा 27 एप्रिल 2017 रोजी कार्यभार हाती घेतला होता. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आल्याने त्यांची तत्काळ बदली होईल असे मानले जात होते. पण, कोरोना महामारी आली. कोरोना काळात आयुक्तांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली.










Leave a Reply