Lonavala news: लोणावळा परिसरात आजपासून 5 जानेवारीपर्यंत ‘नाईट कर्फ्यू’

Lonavala news: लोणावळा परिसरात आजपासून 5 जानेवारीपर्यंत ‘नाईट कर्फ्यू’

Pckhabar- ख्रिसमस आणि नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा आणि परिसरात आजपासून 5 जानेवारी जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

दरवर्षी ख्रिसमस नाताळ आणि नूतन वर्षाला लोणावळ्यात हजारो पर्यटकांची गर्दी होत असते. परंतु, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नाईट कर्फ्यूचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

लोणावळा शहरात दरवर्षी हजारोच्या संख्येने पर्यटक नूतन वर्ष आणि ख्रिसमस सण साजरा करण्यासाठी येतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रामध्ये रात्री 11 ते सकाळी 6 असा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. परंतु, महानगरात नाईट कर्फ्यू लागल्याने न्यू इयर साजरा करण्यासाठी अनेक हौसी पर्यटकांची गर्दी लोणावळ्यात होण्याची शक्यता होती. त्याच पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांनी प्रशासनाकडे नाताळ आणि नूतन वर्षाच्या दिवशी नाईट कर्फ्यू लावण्या संबंधी प्रस्ताव देण्यात आला होता.

पुणे ग्रामीण हद्दीतील पर्यटकांची व नागरिकांची लोणावळा, अॅम्बी व्हॅली लवासा, भूशी डॅम, मुळशी डॅम, ताम्हीणी घाट, सिंहगड रोड, खडकवासला या पर्यटन स्थळी तसेच फार्म हाऊस, रिसॉर्ट इत्यादी ठिकाणी नाताळ सण, नववर्षाच्या निमित्ताने मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, तसेच मावळ, मुळशी व हवेली या तालुकयातील संपुर्ण कार्यक्षेत्रामध्ये तसेच शिरुर तालुक्यातील कोरेगाव भिमा, डिग्रजवाडी, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये दिनांक 25 डिसेंबर ते दिनांक 05 जानेवारी 2021 दरम्यान रात्री 11 ते सकाळी 06 पर्यंत जमावबंदी आदेश पारित होणे आवश्यक असल्याचे नमुद केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *