Pimpri news: व्याख्याते नामदेवराव जाधव यांची पावणेसात लाखांची फसवणूक

 

Pimpri news: व्याख्याते नामदेवराव जाधव यांची पावणेसात लाखांची फसवणूक
Pckhabar-श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र, त्यांनी बांधलेल्या किल्याची आंतरराष्ट्रीय पर्यटकांना माहिती व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय मोबाईल अ‍ॅप बनवून देण्याचे आमिष व्याख्याते, लेखक नामदेवराव जाधव यांना सिन्ड्रीया बिजनेस सोल्युशन्स या कंपनीच्या संचालकांनी दिले. त्यासाठी जाधव यांच्याकडून कंपनीच्या संचालकांनी सहा लाख 80 हजार रूपये घेतले. मात्र, अ‍ॅप बनवून न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

याप्रकरणी नामदेवराव निवृत्ती जाधव (वय-42, रा. भिमाशंकर कॉलनी, आदर्शनगर, किवळे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार  सिन्ड्रीया बिजनेस सोल्युशन्स कंपनीचे संचालक टोनी थॉमस, सपना (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेवराव जाधव हे प्रसिध्द लेखक असून व्याख्याते आहेत. त्यांचे  ’शिवाजी द मॅनेजमेंट गुरू’ हे गाजलेले पुस्तक आहे.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी थॉमस आणि सपना यांनी जाधव यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र, त्यांनी बांधलेल्या किल्यांचा इतिहास जगभरातील पर्यटकांना माहिती होण्यासाठी आंतरराष्ट्रीय मोबाईल अ‍ॅप बनवून देण्याचे आमिष दाखविले.  आरोपींनी अ‍ॅप बनविण्यासाठी वेळोवेळी रोख रक्कमेसह धनादेशाव्दारे जाधव यांच्याकडून 6 लाख 80 हजार रूपये घेतले. अ‍ॅप बनवून न देता त्यांनी दिलेल्या पैशांचा अपहार केला. फौजदार कुदळे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *