Pimpri crime news: वायसीएममधील सुरक्षा रक्षकाने रूग्ण महिलेचा केला विनयभंग

Pimpri crime news: वायसीएममधील सुरक्षा रक्षकाने रूग्ण महिलेचा केला विनयभंग
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एकाने रूग्ण महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी आरोपी सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
अनिल मारूती स्वामी (वय-47, रा. खडकी) असे अटक केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला वायसीएम रूग्णालयात उपचार घेत आहे. महिलेचा विश्वास संपादन करून तिच्या आजारपणाचा आरोपीने गैरफायदा घेत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला त्वरीत अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *