Bhosari crime news: जेवण वाढण्यास सांगितले म्हणून पत्नीने पतीला सळईने मारले

Bhosari crime news: जेवण वाढण्यास सांगितले म्हणून पत्नीने पतीला सळईने मारले
Pckhabar- पतीने जेवण वाढण्यास सांगितले म्हणून पत्नीने जेवण वाढण्यास नकार देत लोखंडी सळईने उजव्या हाताच्या मनगटावर, कोपर्‍यावर मारले. यामध्ये पतीच्या हाताचे हाड मोडले. हा प्रकार भोसरीतील शिवशंकर कॉलनी येथे घडला.
सत्यशिला प्रकाश मठपती (वय-34, रा. भोसरी) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा पती प्रकाश महारूद्रप्पा मठपती (वय-61) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश मठपती यांनी पत्नीला जेवण वाढण्यास सांगितले. आरोपीने जेवण वाढण्यास नकार दिला. यामुळे दोघांची वादावादी झाली. यामुळे चिडलेल्या आरोपी सत्यशिला यांनी शिवीगाळ करत लोखंडी सळईने पतीच्या उजव्या हातावर, मनगटावर जबर मारहाण केली. यामध्ये त्यांचा हाड मोडले. फौजदार काळे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *