Dehuroad crime news: अमेरिकेतून तोंडी तलाक देणार्‍या पतीसह चौघांवर गुन्हा

Dehuroad crime news: अमेरिकेतून तोंडी तलाक देणार्‍या पतीसह चौघांवर गुन्हा
Pckhabar- विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला तिच्या पतीने अमेरिकेतून तोंडी तलाक दिला. तसेच तिला तिच्या मुलाला सहा महिन्यांपासून भेटू दिले नाही. याबाबत तिने पोलीस ठाण्यात पती, सासू, चुलते सासरे आणि नणंदेच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
  पती रफिक रजाक तांबोळी, सासू जमेलाबानू रजाक तांबोळी, चुलत सासरे सत्तरभाई महम्मद तांबोळी, नणंद समिना फरीद तांबोळी (सर्व रा. देहूरोड, मेन बाजार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी पीडितविवाहितेचा सन 2016 पासून 22 डिसेंबर 2020 या कालावधीत शारीरिक व मानसिक छळ केला. विवाहितेच्या मुलाला सहा महिन्यांपासून भेटू दिले नाही. तसेच आरोपींनी थेट अमेरिकेतून इस्लामी कायद्यानुसार तोंडी तलाक दिला. विवाहितेने तिला नांदविण्यासाठी घेण्याची आरोपींना वारंवार विनंती केली. मात्र, आरोपींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *