Pimpri news: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबाना सानुग्रह अनुदानाचे वाटप
Pckhabar- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या चार पोलिसांच्या कुटुंबाना पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते सानुग्रह अनुदानचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहा.पोलीस आयुक्त एन.जे.पिंजन, कोरोना सेलचे पोलीस अधिकारी अनिल लोहार व त्यांची संपुर्ण टिम आणि तसेच मृत्यु पावलेले पोलीस अमलदार कै.संतोष प्रताप झेंडे यांची पत्नी- मंगल संतोष झेंडे, के.पोहवा, अंबरनाथ रामचंद्र कोकणे यांची पत्नी- सुंदराबाई अंबरनाथ कोकणे आणि के.पोना, रमेश वामन लोहकरे यांची पत्नी-प्रमिला रमेश लोहकरे, त्यांची मुलगी समीक्षा असे उपस्थित होते.
यांच्यासह दिवगंत पोलिसांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, आपल्या कुटुंबातील सदस्य हे लोकांची सेवा करत असताना मृत्यु पावले आहेत. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी जनतेच्या सेवेसाठी उत्कृष्ट कर्तव्य बजावले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांचे मनोबल वाढविले.
पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई मध्यवर्ती पोलीस कल्याण निधीतून विशेष सहाय्यता निधी रुपये १० लाखांचे धनादेश देण्यात आले.










Leave a Reply