Pune news: पुण्यात पुन्हा रानगव्याचे दर्शन; नागरिकांनी बावधन परिसरात गर्दी करु नये, प्रशासनाचे आवाहन
Pckhabar- पुण्यात पुन्हा रानगव्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाषण तलावाजवळ रानगवा आढळला असून नागरिकांनी हायवे आणि बावधन परिसरात गर्दी करु नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
९ डिसेंबरला कोथरूड परिसरात आलेल्या गव्याला रेस्क्यू करताना उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त केली गेली होती. त्यानंतर आज पुन्हा गवा आल्यानंतर प्रशासनाची आणि रेस्क्यू टीमची मोठी त्रेधातिरपीट उडालेली आहे. या गव्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याचे आव्हान देखील प्रशासनासमोर आहे.
बावधन येथील हायवेलगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्यापलीकडे जंगलात हा गवा आलेला आहे. त्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलिस हे घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. रेस्क्यू करण्याचे काम चालू असून घटनास्थळी स्थानिक नगरसेवक किरण दगडे पाटील हेदेखील बारकाईने लक्ष ठेवून उपस्थित आहेत.
रेस्क्यू ऑपरेशनसाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे, त्यामुळे कृपया येथे कोणीही गर्दी करू नये, असे आवाहन नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केले आहे.










Leave a Reply