Maharashtra news: भाजप आमदाराच्या लग्नात हजारोंची गर्दी, सर्वसामान्यांना 50 लोकांची परवानगी!

Maharashtra news: भाजप आमदाराच्या लग्नात हजारोंची गर्दी, सर्वसामान्यांना 50 लोकांची परवानगी!
Pckhabar- कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या विवाहासह विविध कार्यक्रमाना ५० जणांनीच हजर राहायची मर्यादा आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या शाही विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी झालेली पाहायला मिळाली. या सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहे, अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनाच ‘दो गज की दूरी, मास्क पेहनना है जरूरी’ चा विसर पडला.

विशेष म्हणजे या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार मुक्ता टिळक, नितेश राणे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजपची नेतेमंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही आहे. कोरोनावर लस आली नसताना लोकप्रतिनिधीच कोरोनाबाबतचे नियम धाब्यावर बसवत आहेत. विवाह सोहळ्यात ५० जणांची मर्यादा पाळण्याचा नियम लोकप्रतिनिधींनीच मोडणे, हे खेदजनक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *