Delhi news : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे कोरोनामुळे निधन

Delhi news : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे कोरोनामुळे निधन

Pckhabar-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे आज  पहाटे तीन वाजता निधन झाले. त्यांना प्रकृतीमध्ये झालेल्या गुंतागुतीमुळे गुडगावच्या मेदांता रुग्णालयाच्या इंटेंसिव्ह केअर युनिटमध्ये (आयसीयू) दाखल करण्यात आले होते. त्यांचा मुलगा फैसल पटेल यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.

अहमद पटेल यांना काही आठवड्यांपूर्वी कोरोना व्हायरसची लागण झाली होती. ७१ वर्षीय अहमद पटेल यांनी १ ऑक्टोबरला ट्विट केले होते की, त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

फैसल पटेल यांनी ट्विट करून माहिती दिली की २५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडे तीन वाजता माझे वडील अहमद पटेल यांचे निधन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *