Pimpri smart citi news: 520 कोटींच्या कंत्राटाची चौकशी सुरू; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
Pckhabar-पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या स्मार्ट एकात्मिक प्रकल्पाअंतर्गत जलनिस्सारण, पाणीपुरवठा जल मापक बसवणे या 520 कोटी रुपयांच्या कंत्राटाची चौकशी करण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या स्मार्ट एकात्मिक प्रकल्पाअंतर्गत जलनिस्सारण, पाणीपुरवठा जल मापक बसवणे या कामाची 520 कोटी रुपयांची निविदा 9 ऑक्टोबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये जलनिस्सारण, पाणीपुरवठा जल मापक बसवणे आदी कामाचा समावेश होता. टेक महिंद्रा कंपनी लिमिटेड, क्रिस्टल इंटग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि आरसीअस इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्याना एकत्रितपणे हे 520 कोटी रुपयांचे कंत्राट बहाल करण्यात आले. प्रत्यक्षात हे काम केवळ 150 ते 200 कोटी रुपयांचे आहे. त्यामुळे या निविदेत सुमारे 300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. यात भाजपचे उच्चपदस्थ नेते, शहरातील आमदार, स्मार्ट सिटीचे संचालक आणि भाजप, संघधार्जिणे पालिका आयुक्त यांची मिलिभगत आहे. हे संगनमताने लूट करत आहेत, असा आरोप बाबर यांनी केला आहे.
शिवसेना पिंपरी-चिंचवड कार्यकारिणीने आज (मंगळवारी) पत्रकार परिषद घेत या कंत्राटातील गोलमालाचा भांडाभोड केला. जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, महिला संघटिका उर्मिला काळभोर, अनंत को-हाळे, बाळासाहेब वाल्हेकर, मॅचिंद्र देशमुख, अनिता तुतारे, आदिक भोसले, हरेश नखाते, अमोल निकम, विवेक तितरमारे, ज्ञानेश्वर शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.










Leave a Reply