Pune news : महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समितीच्यावतीने गरजूंना कपडे व मिठाई वाटप
Pckhabar-दिवाळी सणाचे औचित्य साधून महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समितीच्यावतीने शहरातील विविध ठिकाणच्या गरजूंना कपडे व मिठाई वाटप करण्यात आली.
अशा व्यक्तींना हा आनंदाचा सण साजरा करता यावा, या उद्देशाने वैकुंठधाम येथील कार्यरत कर्मचारीवर्ग, सारस बागेसमोरील फुगे विकणारी मुले, मार्केट यार्ड परिसरातील रस्त्यावर फुले विकणारी मुले, जिजामाता उद्याना समोरील गरीब व्यक्ती, खडकमाळ भागातील सेवा मित्र मंडळ येथे अंध व्यक्ती, बुधवार पेठ भागातील तृतीयपंथी आदींना कपडे व मिठाई वाटप करण्यात आली.
या उपक्रमाच्या आयोजनात उपमहापौर सरस्वती शेंडगे, सामाजिक कार्यकर्त्या अनंतलक्ष्मी कैलाशन, वर्षा तांबोळी, मनिषा निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते, पंकीश ठक्कर आदींनी सहभाग घेतला.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)












Leave a Reply