Pimpri Corona News: चिंताजनक! दिवाळीनंतर शहरात 1 हजार नवीन रुग्ण
Pckhabar-दिवाळीनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. मागील सहा दिवसांत तब्बल 1 हजार 6 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 30 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती राज्य सरकारने व्यक्त केली होती. पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढविले नाही. तरी, देखील मागील सहा दिवसात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिवाळी सणानंतर रुग्णवाढीचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला दीडशेहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे.

सोमवारी (दि.16) दिवाळी संपली. त्यानंतर मंगळवारी (दि.17) 98 नवीन रुग्ण तर 8 मृत्यू, बुधवारी 158 रुग्ण 4 मृत्यू, गुरुवारी 179 रुग्ण 5 मृत्यू, शुक्रवारी 164 रुग्ण 8 मृत्यू, शनिवारी 192 रुग्ण 5 मृत्यू, रविवारी 215 नवीन रुग्ण तर एकही मृत्यू झाला नाही. सहा दिवसात तब्बल 1 हजार 6 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 30 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे.
शहरातील 33.9 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला!
शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आजपर्यंत शहरातील 90 हजार 696 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण 2.75 टक्के आहे. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी सुमारे 87 हजार 275 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे 96 टक्के असून मृत्यूदर 1.25 टक्क्यांच्या आसपास आहे. शहरातील 33.9 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे. सुमारे साडे आठ लाख नागरिकांमध्ये अँटिबॉडीज (प्रतिपिंड) विकसित झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply