Mumbai news: 10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊन संदर्भात निर्णय : अजित पवार
Pckhabar-दिवाळीनंतर राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला आहे. हिवाळ्यात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बर्याच राज्यात कोरोना संक्रमण वाढले आहे. महाराष्ष्ट्रातही कोरोनाचे रूग्ण वाढ आहेत. त्यामुळे येत्या 8 ते 10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, त्यानंतर टाळेबंदीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पवार पुढे म्हणाले, की दिवाळीच्या वेळी बरीच गर्दी होती. गणेश चतुर्थी दरम्यानही अशीच परिस्थिती होती. आम्ही संबंधित विभागांशी बोलत आहोत. आम्ही पुढील 8-10 दिवस परिस्थितीचा आढावा घेऊ आणि नंतर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल. दिवाळीच्या वेळी लोकांनी अशी गर्दी केली जणू या गर्दीमुळे कोरोना मरणार आहे.
राज्य सरकारने एक नियमावली तयार केली आहे, ज्यामध्ये शिक्षकांची टेस्टिंगसह इतर नियम आहेत. याउलट महापालिका आणि जिल्हा परिषदा निर्णय घेऊ शकतात. परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, नागरिक पॅनिक होतील असे मी बोलणार नाही, पाच सहा दिवसांत आढावा घेऊ, असेही पवार म्हणाले.
कार्तिकी एकादशीबाबत निर्णय राज्य सरकार घेईल. उपमुख्यमंत्री जात असतात, किंवा सिनिअर जातात. मास्कची दिल्लीत जास्त कारवाई झाली आहे. आपल्याकडे कमी झाली, दिवाळीत आनंद होता म्हणून कारवाई केली नाही, आता करू, पाच सहा दिवसांत लॉकडाऊन बाबत सगळं चित्र सष्ट होईल. आचारसंहितेमुळे मला अधिकार्यांची बैठक घेता आली नाही. मात्र, लोकांना विनंती आहे, 500 रुपये न भरता मास्क वापरावे, एक तारखेनंतर मी बैठक घेणार आहे.


बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply