Pune news : पुणे पदवीधर निवडणूकीत अपक्ष उमेदवार गणेश काटकर यांना पसंती क्रमांक 1 चे मत देऊन विजयी करा – अनिरूध्द शेलार

 

Pune news : पुणे पदवीधर निवडणूकीत अपक्ष उमेदवार गणेश काटकर यांना पसंती क्रमांक 1 चे मत देऊन विजयी करा – अनिरूध्द शेलार
Pckhabar- पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत अपक्ष उमेदवार गणेश सुखदेव काटकर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यांना पदवीधरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काटकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. काटकर यांना पसंती क्रमांक 1 चे मत देऊन विजयी करा, असे आवाहन ‘आम्ही मराठा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिरूध्द शिवाजी शेलार यांनी केले आहे.

अनिरूध्द शेलार म्हणाले, सुशिक्षित बेरोजगार व पदवीधर तरूणांचे भविष्य उज्वल करण्यासाठी गणेश सुखदेव काटकर पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवित आहेत. त्यांना पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर पाचही जिल्ह्यात त्यांना पदवीधरांचा आणि युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. काटकर यांचा त्यांचा अनुक्रमांक 20 आहे. येत्या 1 डिसेंबर रोजी काटकर यांना पसंती क्रमांक 1 चे मत देऊन विजयी करावे, असे आवाहन ‘आम्ही मराठा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिरूध्द शिवाजी शेलार यांनी केले आहे.

 

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *