Chinchwad crime news : डॉक्टरने केला तरूणीचा विनयभंग
Pckhabar-मोटारीमध्ये थांबलेल्या तरूणीचा एका डॉक्टरने विनयभंग केला. ही घटना चिंचवड येथे घडली. दरम्यान, हे प्रकरण चिंचवड ठाण्याचे निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्याशी निगडित आहे. याचप्रकरणातूनच त्यांचे निलंबन करण्यात आले होते.
याप्रकरणी 21 वर्षीय पीडित तरूणीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी डॉ. वैभव लाडे याच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी त्यांच्या ओळखीचा इसम सुशांतकुमार यांच्यासोबत कामानिमित्त चिंचवड पोलीस ठाण्यात आली होती. त्यावेळी सुशांतकुमार काही काळासाठी कारमधून बाहेर गेले. त्यावेळी कारजवळ आरोपी डॉ. वैभव लाडे आला. आरोपी डॉक्टरने तरूणीला ‘तू सुशांतकुमार सोबत आहेस का’, अशी विचारणा केली. तिने ‘हो’ उत्तर दिल्यानंतर आरोपी तरूणीशी अश्लील भाषेत बोलू लागला. आरोपीने तरूणीच्या अंगाला स्पर्श केल्यानंतर तिने आरडाओरडा सुरु केला. त्यामुळे आरोपी डॉक्टरने पीडित तरूणीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली व ‘तुझा डायरेक्टर सुशांतकुमार याचा गेमच करतो’, अशी धमकी दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे अधिक तपास करत आहेत.


बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply