Maharashtra news : विधान परिषदेसाठी बारा उमेदवार ठरले, पहा कोणाला मिळाली संधी

Maharashtra news : विधान परिषदेसाठी बारा उमेदवार ठरले, पहा कोणाला मिळाली संधी

Pckhabar-विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 नावे सुचवण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रत्येकी 4 – 4 -4 नावं पुढे आली आहेत.

शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांचा समावेश आहे.

काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, अनिरुद्ध वनकर आणि मुझफ्फर हुसेन या नावांची शिफारस करण्यात येणार आली आहे.

राष्ट्रवादीकडून भाजपमधून आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव सुचवण्यात आलं आहे. याशिवाय NCP ने राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे या नावांची शिफारस केल्याचं समजतं.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *