Pimpri news : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची फेसबुकवर बदनामी ; दोघांविरोधात गुन्हा
Pckhabar- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबाबत फेसबुक अकाऊंटवरून एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक या फेसबुक पेजवर बदनामीकारक आणि विडंबन करणारी छायाचित्रे पोस्ट केल्याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुब जमादार आणि किर्तीसिंह कोरेकर पाटील (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयुब जमादार या आरोपीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे छायाचित्र क्रॉप करून आपल्या फेसबुक अकाऊंटवरून बदनामीकारक मजकुरासह प्रसिद्ध केले. त्याचप्रमाणे किर्तीसिंह कोरेकर पाटील या दुसऱ्या आरोपीने चंद्रकांत पाटील यांचे ते छायाचित्र एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक या फेसबुक पेजवर पाठविले.
निगडी पोलिस ठाण्याचे फौजदार पी. डी. आरदवाड तपास करत आहेत.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply