Pimpri news : पोलिसांच्या हप्तेवसुलीची सीआयडीमार्फत चौकशी
व्हायरल पत्राची सरकारने घेतली गंभीर दखल
Pckhabar- पोलीस निरीक्षकाच्या मदतीने तत्कालीन पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी तळेगाव येथे शंभर एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप पत्रात केला होता. तसेच दर महिन्याला शहरातील अवैध धंदेवाल्याकडून चार कोटी रूपये हप्ता वसूल केला जात असल्याचाही उल्लेख करण्यात आला होता. काही लोकप्रतिनिधींनाही दरमहा 15 लाखांची पाकीट देण्यात येत असल्याचा धक्कादायक उल्लेेेखही व्हायरल पत्रात करण्यात आला होता.
या प्रकरणाची आता सीआयडी चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस नाईक नितीन लोखंडे यांच्या नावाने समाज माध्यमांवर पत्र व्हायरल झाले होते. त्यात तत्कालीन पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी खंडणी व दरोडा पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मदतीने तळेगाव येथे शंभर एकर जमीन खरेदी केल्याचा उल्लेख होता. शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि सीआयडीतर्फे चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
समाज माध्यमांवर पोलीस नाईक लोखंडे यांच्या नावे पत्र प्रसारित झाल्यावर शहरात खळबळ उडाली होती. त्यात मी गरीब घरचा मुलगा असून, माझ्या जीवाला धोका आहे, असे सांगून पोलीस दलातील भ्रष्टाचार, राजकीय लागेबांधे आणि हप्तेखोरीवर भाष्य केले होते.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply