Pimpri crime news : पत्नीच्या उपचारासाठी काढले कर्ज; चोरट्याने चोरली रोकड
Pckhabar- पत्नीच्या औषधोपचारासाठी एकाने लाखांचे कर्ज काढून ते पैसे घेऊन पीएमपीएमएल बसने प्रवास करताना चोरट्याने त्यांच्या खिशातील पैसे चोरून नेले. ही घटना निगडी ते एस. के. एफ कंपनी या दरम्यानच्या बस प्रवासात घडली.
बबन सुरमाजी पवार (वय-57, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नी आजारी असून पवना हॉस्पीटलमध्ये दाखल आहेत. त्यांच्या औषधोपचारासाठी त्यांनी एक लाख पाच हजारांचे कर्ज काढले होते. ती रक्कम त्यांच्या पॅन्टच्या चोर खिशात ठेवली होती. पत्नीला भेटून ते निगडीतून पीएमपीएमएल बसने खडकीकडे जात होते. निगडी ते एस. के. एफ कंपनी या प्रवासामध्ये चोरट्यांनी त्यांच्या खिशातील 1 लाख पाच हजार रूपये चोरून नेले. फौजदार मोरे तपास करत आहेत.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply