Pune news : महात्मा फुले अध्यापक विद्यालयाचे प्रदीप हिवरकर यांचा गौरव

Pune news : महात्मा फुले अध्यापक विद्यालयाचे प्रदीप हिवरकर यांचा गौरव

Pckhabar- जागतिक पातळीवर भारतीय शिक्षणात गुणात्मक वाढ,संशोधन व मूल्यांकन करणाऱ्या Quality  council of India व National Accridition & Board for Education &Training (NABET) नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शिक्षण, कौशल्य विकसन, शिक्षणातील जागतिक बदल या विषयावर व्यापक उद्देशाने दोन दिवस Online workshop on Enhancing Blended & online Teaching Capability through Hands -on Training या कार्यशाळेचे आयोजन केले होते. देश विदेशातील अनेक शिक्षकांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता.
       त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून एकमेव रयत शिक्षण संस्थेचे, महात्मा फुले अध्यापक विद्यालयाचे अध्यापकाचार्य श्री. हिवरकर प्रदीप बबन यांनी सहभाग घेतला व सर्व टास्क उत्तम पद्धतीने पूर्ण केले व महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेची भूमिका, शिक्षणातील अभिनव उपक्रम ,कर्मवीर विद्याप्रबोधिनी तसेच रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन चे काम याविषयी सविस्तर माहिती दिली.
       National Accridition & Board for Education &Training (NABET) नवी दिल्ली  चे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक डॉ. मनीष कुमार यांचेकडून सर्व टास्क पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
     याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव प्रिं. डॉ. विठ्ठल शिवणकर,  प्रिं.डॉ. प्रतिभा गायकवाड सहसचिव (उच्च शिक्षण), श्री. संजय नागपुरे सहसचिव (माध्यमिक), प्रिं.डॉ. शिवलिंग मेनकुदळे ऑडिटर, रयत शिक्षण संस्था, सातारा कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे कार्यकारी संचालक श्री. आर. के. शिंदे ,विभागीय अधिकारी श्री. कमलाकर महामुनी, सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. सुरेशकुमार गोडसे, प्राचार्य डॉ. विलास पाटील, प्राध्यापक, रयत सेवक यांनी विशेष अभिनंदन केले.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *