Mumbai news : विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर

Mumbai news : विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर
Pckhabar- विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. या जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकत्रित ताकद विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळेल.

औरंगाबाद, नागपूर आणि पुणे पदवीधर मतदार संघ तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदार संघ यासाठी ही निवडणूक होईल.

राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने आपला झेंडा फडकावल्यामुळे विधानपरिषदेत भाजपचं वजन वाढलं आहे. मात्र आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले असल्याने पुन्हा समीकरण बदललं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *