Mumbai news : उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त; ब्रीच कॅन्डीतून डिस्चार्ज
Pckhabar-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. पवार आज (सोमवारी) कोरोनामुक्त झाले असून त्यांना ब्रीच कॅन्डीतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबतची माहिती त्यांच्या बहीण खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
अजित पवार यांना 26 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आठ दिवस उपचार घेऊन त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुढील आठ दिवस ते आराम करणार असून त्यानंतरच ते बाहेर पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोनाच्या सुरुवातीपासून अजित पवार बाहेर पडून काम करत होते. राज्यभर फिरत होते. पुण्यात दर शुक्रवारी बैठक घेऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत होते.
अजित पवारांना डिस्चार्ज अन् खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्ट !
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar दादा यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आणखी सात दिवस घरीच विलगीकरणात राहणार असून त्यानंतर ते पुर्वीप्रमाणे आपल्या सर्वांसोबत असतील दादांच्या आजारपणात विविध पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेने ते लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. त्या सर्वांचे मनापासुन आभार आपणा सर्वांच्या सदिच्छा व शुभेच्छा तसेच रुग्णालयातील वैद्यकीय स्टाफ यांचे प्रयत्न यांच्या जोरावर दादांनी कोरोनावर यशस्वी मात केली. याबद्दल सर्वांचेच मनापासून आभार, आपण दाखविलेले प्रेम, काळजी अनमोल आहे. धन्यवाद,










Leave a Reply