Pune news : बॅग भरो निकल पडो; गिर्यारोहणाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

Pune news : बॅग भरो निकल पडो;
गिर्यारोहणाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

Pckhabar- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर  गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या गिर्यारोहणाला परवानगी देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश काढले आहेत.

महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनामध्ये गिर्यारोहण व इतर साहसी खेळांच्या वृद्धीसाठी अविरतपणे काम करणारी संस्था आहे. ज्या प्रमाणे धरण परिसरातील पर्यटन निबंध हटविण्यासंदर्भात प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.

त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील गड किल्यांवर, कातळकड्यांवर गिर्यारोहण, ट्रेकिंग करण्यासंबंधी प्रशासनाची परवानगी प्रकाशित केल्यास साहसवीरांना हुरूप येईल. गिर्यारोहण व साहसाचे माहेरघर पुन्हा एकदा खुलेल’ अशी विनंती करण्यात आली होती.

या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी गड किल्ल्यांवरील ट्रेकिंगला परवाना दिली आहे. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी गड किल्ल्यांवरील ट्रेकिंगला परवानगी दिली आहे. परंतु, ही परवानगी देताना काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यामध्ये कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरुपात पुणे जिल्हयातील गड किल्यांवर, कातळकड्यांवर गिर्यारोहण, ट्रेकिंग साठी जाताना एका ग्रुपमध्ये १५ पेक्षा जास्त सदस्य नसावेत.

ट्रेकिंगसाठी येणा-या प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्क्रिनिंग करणेत यावे, अधिक संख्या असल्यास वेगवेगळे ग्रुप करुन वेळेमध्ये फरक ठेवावा, ट्रेकिंगसाठी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील, सहभागी व्यक्तींनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहिर केलेल्या सूचनांनुसार योग्य ते शारिरिक अंतर राखणेबाबतचा नियम काटेकोरपणे पाळणेत यावा, दहा वर्षांचे आतील तसेच पासष्ट वर्षावरील व्यक्तींना सहभाग देऊ नये, ताप, सर्दी खोकला इ. कोरोना सदृश्य लक्षणे असणा-या व्यक्तींना सहभाग देऊ नये, स्थानिकांच्या घरात भोजन, मुक्काम इ.करु नये. अशा विविध सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *