Pune news: कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण
Pckhabar- राज्याचे कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती पाटील यांनी स्वतः समाजमाध्यमाद्वारे दिली आहे.

वळसे पाटील आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोणाची चाचणी करून घ्यावी आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.
महाविकास आघाडी सरकारमधील नऊ मंत्र्यांना आजपर्यंत कोरोनाची लागण
महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मात केली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही कोरोनावर मात केली आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपचार घेत आहेत.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply