Maharashtra news :शिवसेनेचे संपर्कमंत्री जाहीर; कोणत्या जिल्ह्याची कोणत्या मंत्र्यांकडे जबाबदारी?
Pckhabar-शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्कमंत्री जाहीर केले आहेत. पुणे जिल्ह्याची जबाबदारी परिवहन, संसदीय कामकाज मंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे देण्यात आली आहे.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई शहर, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे जालना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (चंद्रपूर, गोंदिया), उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (कोल्हापूर, सातारा), कृषिमंत्री दादा भुसे (नाशिक, नगर), पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (बुलढाणा, अमरावती), परिवहनमंत्री अॅड. अनिल परब (पुणे, रायगड), जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (सोलापूर, सांगली), वनमंत्री संजय राठोड (नांदेड, भंडारा-नागपूर), फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (बीड, लातूर). महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (नंदूरबार, वर्धा), गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (हिंगोली, परभणी)ची जबाबदारी देण्यात आली आहे.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply