Pimpri corona News: शहरात 216 नवीन रुग्ण, 436 जण कोरोनामुक्त, 4 मृत्यू

ही बातमी शेअर करा.

Pimpri corona News: शहरात 216 नवीन रुग्ण, 436 जण कोरोनामुक्त, 4 मृत्यू

Pckhabar-  पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 209 आणि पालिका हद्दीबाहेरील 7 अशा 216 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे.   उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 436 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 87 हजार 260 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 83 हजार 810 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1523 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 627 अशा  2150 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 888 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 889 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील 4 जणांचा आज मृत्यू  झाला आहे. त्यात चिंचवड 33 वर्षीय युवक, 50 वर्षीय पुरुष, भोसरी 49 वर्षीय पुरुष, च-होली येथील 36 वर्षीय युवक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


ही बातमी शेअर करा.