Dehu news : गोंदण दिवाळी अंकाचे देहूत प्रकाशन

ही बातमी शेअर करा.

Dehu news : गोंदण दिवाळी अंकाचे देहूत प्रकाशन

Pckhabar- कुलस्वामिनी प्रतिष्ठान मार्फत गोंदण दिवाळी अंकाचे प्रकाशन
देहू देवस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. मधुकर महाराज मोरे, पंचायत समितीच्या माजी सभापती हेमलता काळोखे, देहू देवस्थानचे विश्वस्त भानुदास महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

तीर्थक्षेत्र देहूतील संत तुकाराम मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

गोंदण दिवाळी अंकाचे हे ७ वे वर्ष असून मुख्य संपादक गुरूवर्य पी.के.गाडिलकर यांच्या प्रेरणेतून कुलस्वामिनी प्रतिष्ठानची स्थापना झालेली आहे. स्वतःसाठी जगताना समाजासाठी थोड जगा ,असा महामंत्र सरांनी दिलेला आहे. साहित्य, संस्कार, संस्कृती, कला, क्रीडा संवर्धन ही गोंदणची प्रमुख वैशिष्टये असून तळागाळातल्या व सामाजिक बांधीलकी जोपासणा-या साहित्यिकासह ,दर्जेदार व गुणवत्तापुर्ण साहित्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून गोंदणची ओळख साहित्य जगताला झालेली आहे.
गोंदणच्या निर्मितीत संपादकीय मंडळ सजग व पारदर्शिकपणे कार्य करीत असते, गेल्या सात वर्षात आदरणीय गाडीलकर सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगदेव पिंगळे, दादाभाऊ गावडे, उज्जवला पिंगळे यांनी संपादकीय मंडळात निष्ठापुर्वक काम केले आहे.

सध्या कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ.माळशिरसकर असून अंकाच्या निर्मितीसाठी लागणारे अर्थसहाय्य जाहिरातीच्या माध्यमातून  मिळविण्यात त्यांच्यासह प्रतिष्ठानचे सचिव ज्ञानेश्वर खैरे यांनीही भरीव कार्य केले आहे.

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे अंकाची निर्मिती हे सर्वात मोठे आव्हान होते. परंपरा खंडीत होऊ नये म्हणून प्रतिष्ठानचे सदस्य आग्रही राहिले व अंकाची निर्मीती करण्यात आली. साहित्याची निवड व प्रुफ रीडींग सहसंपादक दादाभाऊ गावडे यांनी केले. पुरस्कार प्राप्त साहित्याची निवड गाडिलकर सरांनी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोंदणचे सहसंपादक दादाभाऊ गावडे यांनी केले. कुलस्वामिनी प्रतिष्ठान विश्वस्त मंडळातर्फे प्रा.चांगदेव पिंगळेसर यांनी  गोदंणच्या सातवर्षाच्या प्रवासातल्या अडीअडचणीचा लेखाजोखा मांडला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ.माळशिरसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, व्याख्याते विठ्ठलराव काळोखे यांनी ऑनलाइन जमान्यात दिवाळी अंकाला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्यासाठी गोंदण सारखे दर्जेदार साहित्य योगदान देईल असा आशावाद व्यक्त केला.

तसेच इंद्रायणी आहे साक्षीला या काव्यमंचाचे संस्थापक डाॅ.अहेफाज मुलाणी यांनीही साहित्य संस्कृती रुजण्यासाठी नवोदितांना प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. मधुकर महाराज मोरे यांनी गोंदणचे प्रकाशन पुण्यभूमी देहूत केल्याबद्दल प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्या हेमलता काळोखे यांनीही कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या कार्याबाबत आपल्या भाषणात गौरवपुर्ण उद्गार काढले.

याप्रसंगी गोंदण दिवाळी विशेषांकात प्रसिद्ध झालेल्या कथा आणि कवितांच्या राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला तो पुढीलप्रमाणे –

गोंदण साहित्य पुरस्कार
कथा विभाग
प्रथम क्रमांक -भाऊबीज -प्रा.बी.एन.चौधरी ,धरणगाव

द्वितीय क्रमांक -दुभता बैल -सचिन बेंडभर -शिक्रापुर ,शिरूर

तृतीय क्रमांक -जन्मोजन्मी साथ तुझी -अर्चना बोरावके ,श्रीरामनगर

उतेजनार्थ

व्हेटिलेटर -नंदकिशोर ठोंबरे ,नाशिक

निर्णय -महादेव साने ,क-हाड

गूरूदक्षिणा -साहेबराव पवळे -वारजे माळवाडी

कविता विभाग
गोंदण राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार  –
प्रथम क्रमांक -शिवाजीराव चाळक ,चाळकवाडी

द्वितीय क्रमांक -मित्र -अनंत राऊत -हडपसर

तृतीय क्रमांक -गांजलेले -डाॅ .अहेफाज मुलाणी -देहूगाव

उतेजनार्थ कविता ,
बोचत राहाते असे जगणे -अरूण वाळुंज

आरसा -संजय राळे -राजगुरूनगर

मन -मीनल साकोरे -केंदूर  ,शिरूर

कार्यक्रमाच्या सहसंपादिका उज्जवला पिंगळे यांनी आपल्या ओजस्वी भाषेत सुदंर सूत्रसंचालन केले.  प्रतिष्ठानचे खजिनदार नलावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी माजी उपसरपंच रमेश काळोखे, माजी सदस्य  बाळासाहेब काळोखे, साहित्यिक विजयजी चव्हाण, कवी अनिकेत काळोखे, शुभम बेलदार तसेच कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे सर्व सन्मानिय सदस्य उपस्थित होते.

कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून शारीरिक अंतर राखत हा प्रकाशन सोहळा मर्यादित उपस्थितीमध्ये पार पडला. कार्यक्रम आयोजनासाठी  विठ्ठल काळोखे तसेच उद्योजक सचिन काळोखे यांचे सहकार्य लाभले.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)


ही बातमी शेअर करा.