Maharashtra news : राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद होणार ऑनलाईन

Maharashtra news : राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद होणार ऑनलाईन
Pckhabar- भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे गेली सत्तावीस वर्षे ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद’ आयोजित केली जाते. शालेय विद्यार्थ्यांत मुलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. जिज्ञासा ट्रस्ट ठाणे ही संस्था सन २००० पासून महाराष्ट्र राज्यात बाल विज्ञान परिषदेचे समन्वयक म्हणून कार्य करत आहे. या वर्षीची बाल परिषद ही ऑनलाईन होणार आहे.

या उपक्रमात १० ते १७ वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य अशा विविध चाचण्यातून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड केली जाते.  राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ ठरलेल्या बाल वैज्ञानिकां आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विज्ञान परिषदेसाठी देशाचे प्रतिनिधित्व करावयाची संधी मिळते. त्याच बरोबर देशातील महत्वपूर्ण संशोधन संस्थांमध्ये संशोधन करण्याचा अनुभव सुद्धा मिळतो.

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचा या वर्षीचा मुख्य विषय: ”शाश्वत जीवनासाठी सामाजिक नाविण्यपूर्णता” उपविषय :

१. शाश्वत जीवनासाठी परिसंस्था
२. शाश्वत जीवनास योग्य असे तंत्रज्ञान
३. शाश्वत जीवनासाठी आराखडा, विकासकार्य,
४. शाश्वत जीवनासाठी पारंपारिक ज्ञान 

या वर्षीची कोरोना महामारीच्या संकटामुळे ओंन लाईन नोंदणी आणि सादरीकरण होणार आहे.  शाळानि केलेल्या सूचनानुसार, नाव नोंदणी ची मुदतवाढ २४ ऑक्टोबर पर्यंत वाढवलेली आहे.

नवीन वेळापत्रक खालील प्रमाणे.
नूतन वेळापत्रक
नोंदणीची शेवटची तारीख: *२४ ऑक्टोबर २०२०*
सारांश पाठविण्याची शेवटची तारीख : ५ नोव्हेंबर  २०२०
परिषदेसाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना, तज्ञ व्यक्तीमार्फत विनामुल्य मार्गदर्शन जिज्ञासा ट्रस्टच्यावतीने पुढील काळात पण दिले जाईल.
नियमावली व मार्गदर्शक तत्वे

• विद्यार्थी वयोगट – लहान गट १० ते १४ मोठा गट – १४+ ते १७
• कोव्हिड १९ मुळे वैयक्तिक सहभाग असेल. 
• सारांश मर्यादा दोन्ही गटांसाठी  ३०० शब्द
• प्रकल्प शब्द मर्यादा दोन्ही गटांसाठी-  २००० शब्द
नाव नोंदणीसाठी खाली दिलेल्या मेल वर आपले नाव, फोन, शाळेचे नाव कळवावे आपल्याला गुगल फॉर्मची लिंक पाठविण्यात येईल. इमेल – jidnyasatrust@gmail.co
सुरेंन्द्र दिघे.
जिज्ञासा ट्रस्ट ठाणे.
परभणी जिल्हा ई-मेल ba.lad@rediffmail.com
शाळेच्या सहभागाची माहिती पुढील क्रमांकावर व्हाट्स अँप संदेशाद्वारे द्यावी
भरतकुमार लाड-(परभणी जिल्हा समन्वयक)9421489653

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *