Article By Dr. Ankush jadhav : ‘जागतिक नैसर्गिक आपत्ती निवारण दिवस’
Pckhabar- १३ ऑक्टोबर हा दिवस “जागतिक नैसर्गिक आपत्ती निवारण वा जोखीम कपात वा घट दिवस” म्हणून ओळखला जातो व तो नुकताच साजरा केला गेला. या वर्षी या दिवशी मुंबई महानगर पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे ९०० व्यक्तींना आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले. या दिवशी जगभरात आपत्कालीन जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
आपत्ती ही मानवी जीवनातील अपरिहार्य घटना आहे. ही आपत्ती नैसर्गिक व मानवनिर्मित अशा दोन प्रकारची असते. वादळे, भूकंप, अतिवृष्टी, आग इ. नैसर्गिक तर युद्ध, दहशतवादी हल्ले, दंगली इ. मानवनिर्मित आपत्ती आहेत.
१)कपात वा घट
२)प्रतिसाद
३)पुनवर्सन व पुनर्विकास हे तीन सर्वसाधारण आपत्तीचे तीन टप्पे आहेत. कोणत्याही प्रकारची आपत्ती ओढवू नये व आलीच तर होणारे परिणाम कमीत कमी व्हावेत यासाठी उपाययोजना करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. जागतिक आपत्ती कपात कार्यालयाची स्थापना डिसेंबर १९९९ मध्ये करण्यात आली. १९९० ते १९९९ हे दशक नैसर्गिक आपत्ती कपातीसाठीचे आंतरराष्ट्रीय दशक म्हणून घोषित करण्यात आले होते. यावर्षी संयुक्त राष्ट्र आपत्ती जोखीम कार्यालयाकडून एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांमध्ये नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या मनुष्य व आर्थिक हानी याचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
नैसर्गिक आपत्तीसाठी कोणते निकष आहेत?
जागतिक आपत्ती जोखीम कार्यालयाने यासाठी कोणत्याही आपत्तीमध्ये १)१०पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होणे. २)१००किंवा त्यापेक्षा अधिक लोकांवर परिणाम होणे.
३) आणीबाणीची परिस्थिती घोषित होणे.
४)जागतिक मदतीची मागणी होणे, असे निकष लावले गेले आहेत.
तसेच एक लाख वा त्यापेक्षा जास्त मनुष्य बळी घेणाऱ्या आपतींना “महाआपत्ती”(Mega-disaster) म्हणतात.
२००० ते २०२० मधील महत्त्वाच्या मोठया व नैसर्गिक आपत्ती
१)२००४ मध्ये हिंदी महासागरात आलेली त्सुनामी.
२)२००७ मधील हैतीचा भूकंप.
३)२०१० मध्ये म्यानमार (पूर्वीचा ब्रम्हदेश) देशात आलेले नर्गिस नावाचे चक्रीवादळ.
नैसर्गिक आपत्तीचा सामना करणारे प्रमुख देश
सर्वात जास्त नैसर्गिक आपत्तीत आलेल्या देशात अनुक्रमे
१) अमेरिका
२)चीन
३)भारत या देशांचा समावेश आहे.
या कालावधीत भारतात एकूण ३२१ नैसर्गिक आपत्ती आल्या.
प्रमुख नैसर्गिक आपत्ती
२००० ते२०२० या वीस वर्षात एकूण ७३४८ मोठया, गंभीर नैसर्गिक आपत्ती आल्या. त्यात १ कोटी२३ लाख लोकांचा मृत्यू झाला तर ४ कोटी२० लाख लोकांच्या जीवनावर सर्वार्थाने मोठा, गंभीर परिणाम झाला.
-१९८० ते १९९९ या दोन दशकातील नैसर्गिक आपत्तीशी तुलना करता २०००ते २०२० या दोन दशकांत आपत्तीचे प्रमाण दुपटीने वाढले आहे.
या दोन दशकात जगात सर्वाधिक म्हणजे ३०६८ आपत्ती आशिया खंडात आलेल्या आहेत.
२०१५ मध्ये जपान मधील सेंदाई येथे पार पडलेल्या परिषदेत २०१५ ते २०३०साठी नवीन आपत्ती जोखीम कपात कार्ययोजना स्वीकारण्यात आली.
त्यानुसार यात आपत्कालीन पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांची उपलब्धता वाढविण्याचे एक उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
या दिवशी दरवर्षी एक घोष वाक्य जाहीर करण्यात येते त्यानुसार वर्षभर काम केले जाते. या वर्षीचे घोषवाक्य आहे, “Disaster Risk Governance”आपत्ती जोखीम कारभार. कोरोना ची आपत्ती आलीच आहे. आणखीन कोणती मोठी आपत्ती अजून येऊ नये. हीच इच्छा.
डॉ.अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली)
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply