Pimpri corona News: शहरात आज 200 नवीन रुग्ण, 193 जणांना डिस्चार्ज, 8 मृत्यू

ही बातमी शेअर करा.

Pimpri corona News: शहरात आज 200 नवीन रुग्ण,
193 जणांना डिस्चार्ज, 8 मृत्यू

pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 182 आणि पालिका हद्दीबाहेरील 18 अशा 200 नवीन रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली आहे.  उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 193 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 86 हजार 296 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 82 हजार 510 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1499 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 618 अशा 2117 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1336 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

शहरातील 6 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 2 अशा 8 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात निगडी, कासारवाडी, चिंचवड, काळेवाडी, दिघी, बोपखेल, आंबेगाव, आळंदी येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.


ही बातमी शेअर करा.