Maharashtra news : एकनाथ खडसेंना निर्णय घ्यावा लागेल, शरद पवारांचे सूचक विधान
Pckhabar- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. ‘त्यांना जर राजकीय निर्णय घ्यायचा असेल तर, तो त्यांना घ्यावा लागणार आहे’ असे पवार
म्हणाले.
उस्मानाबादमधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशावर भूमिका स्पष्ट केली.
‘एकनाथ खडसे विरोधीपक्ष नेते होते. राज्याचे अर्थमंत्री होते. एक नेता म्हणून खडसे यांचे मोठे योगदान आहे. ‘गेली 25 वर्ष पाहिली तर सर्वात प्रभावी विरोधीपक्ष नेते म्हणून खडसेंची ओळख आहे. पण, दुर्दैवाने त्याची दखल घेतली गेली नाही. त्यांना त्याबद्दल दु: ख वाटत असेल. त्यामुळे आपल्या कामाची जिथे नोंद घेतली तिथे जावे वाटते का, असा विचार करत असतील. पण, त्यांना आमच्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर काही करता येणार नाही’ असं सूचक विधानही पवारांनी केले.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply