उद्योजक पंडितराव पाटील यांचे निधन
Pckhabar- भूम येथील उद्योजक पंडितराव भालचंद्र पाटील यांचे आज (शनिवार) सकाळी निधन झाले. ते 45 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
पंडितराव पाटील हे मूळचे परांडा तालुक्यातील कार्ला येथील रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भूममध्ये वास्तव्यास होते. बांधकाम ठेकेदारीचा त्यांचा व्यवसाय होता. मागील आठ दिवसांपासून त्यांच्यावर सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
भूम-परांडा विधानसभा
मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे
कार्याध्यक्ष प्रतिक पाटील यांचे ते वडील होत.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply