घटस्थापना आणि नवरात्रोत्सवानिमित्त pckhabar च्या वाचकांना शुभेच्छा

घटस्थापना आणि नवरात्रोत्सवानिमित्त pckhabar च्या वाचकांना शुभेच्छा
Pckhabar-भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या, देवीरुपातील स्त्रीशक्तीचे दररोज पूजन होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची आजपासून सुरुवात होत आहे. Pckhabar.com च्या सर्व वाचकांना घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा!

 कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करताना राज्य सरकारने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करावा. नागरिकांनी उत्सवकाळात स्वत:ला, कुटुंबाला, कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी.

  नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीचे पूजन करण्याचा उत्सव. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्रीदुर्गामाता, श्रीअंबामाता, श्रीरेणुकामाता,  श्रीलक्ष्मी, श्रीसरस्वती आदी रुपातील स्त्रीशक्तीचे पूजन करताना आपल्या कुटुंबातील, गावातील, शहरातील, समाजातील माता-भगिनींचाही सन्मान वाढवण्याचे काम झाले पाहिजे. माता-भगिनींना त्यांचा हक्क, न्याय, सन्मान मिळेल, त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि होऊ देणार नाही, असा संकल्प आजच्या घटस्थापनेच्या निमित्ताने करुया.

संपादक & टीम

Pckhabar. Com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *