Maharashtra news : सरकार कुणाचेही असताना चुका होऊ शकतात ; उपमुख्यमंत्री अजित पवार

Maharashtra news : सरकार कुणाचेही असताना चुका होऊ शकतात ; उपमुख्यमंत्री अजित पवार

Pckhabar- महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवार योजनेची SIT चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘सरकार कुणाचेही असताना चुका होऊ शकतात’, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची चौकशी होणार आहे. त्यामुळे भाजपने राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. तर उपमुख्यमंत्री  पवार यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

पवार म्हणाले, ‘जलयुक्त शिवार योजनेची चौकशी कॅगच्या अहवालानुसारच करण्यात येत आहे. राज्य सरकारने  सुडबुद्धीने कारवाई केली नाही. त्यामुळे विरोधकांनी यामध्ये कोणतेही राजकारण आणू नये. सरकार कुणाचेही असताना चुका होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *