MPSC परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यार्थ्यांचे वय निघून जाईल :  मंत्री छगन भुजबळ

MPSC परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यार्थ्यांचे वय निघून जाईल :  मंत्री छगन भुजबळ

Pckhabar-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरती करणे आवश्यक आहे. परीक्षा पुढे  ढकलली तर विद्यार्थ्यांचे वय निघून जाईल. ज्यांना नोकर्‍या मिळू शकतात, त्याचे नुकसान होईल. विद्यार्थांचे नुकसान टाळायचे असेल तर परिक्षेला कुणी विरोध करू नये, अशी भूमिका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडली.

मंत्री भुजबळ पुढे म्हणाले, एमपीएससी परीक्षेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बैठक झाली. महाविकास आघाडी सरकारचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, भरतीआड कुणी यावे असे मला वाटत नाही. भरतीला जे कुणी विरोध करतायत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. आम्हाला नाही तर कुणाला नाही ही भावना चुकीची आहे. यामुळे ओबीसी आणि इतर समाजातील मुलांवर अन्याय होईल, असे ते म्हणाले.

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर गुरूवारी बोचरी टीका केली होती. याबाबत बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले, शिवाजी महाराजांनी देखील अठरा पगड जातीमधील लोकांना एकत्र घेऊन लढाया करत जिंकल्या. त्यामुळे महाराज हे सगळ्यांचे आहेत. मनाला लागतील अशा गोष्टी टाळणे गरजेचे आहे.

 

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *