
थोर शिक्षणमहर्षी, आधुनिक भगिरथ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 आँक्टोबर 1919 साली काले, ता. कराड जिल्हा सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे! लाखो विद्यार्थी आज येथे शिक्षण घेत आहेत. आज बाहेर सर्वत्र कोविडसारख्या आजाराने थैमान घातलेले असताना आज माझ्या रयतचा विद्यार्थी मात्र या शिक्षण प्रवाहापासुन यत्किंचितही दुर झालेला नाही. ROSE सारख्या online education programme च्या माध्यमातुन सर्व विद्यार्थी शाळेशी, संस्थेशी जोडलेले आहेत! ही माझ्यासारख्या प्रत्येक रयतसेवकासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
आज या 101 वर्षपुर्ती सोहळ्याच्या निमित्ताने जाज्वल्य इतिहास असणार्या या मातृसंस्थेस भविष्यातील उज्वल वाटचालीसाठी माझ्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा!!!
सौ. आडकर अश्विनी दिपक, उपशिक्षिका, संत जिजाबाई कन्या विद्यालय,देहू.










Leave a Reply