Talegaon News : तळेगावात रोग प्रतिकारशक्तीच्या चार लाख गोळ्यांचे होणार वाटप

तळेगावात रोग प्रतिकारशक्तीच्या चार लाख गोळ्यांचे होणार वाटप

  Pckhabar- मावळ तालुक्यामध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या महामारीला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकोप्याने काम करावे, असे मत मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांच्या प्रयत्नातून तळेगाव दाभाडे शहरासाठी रोग प्रतिकारशक्ती व रक्त वाढीच्या सुमारे चार लाख गोळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे ,शहराध्यक्ष गणेश काकडे, युवा अध्यक्ष आशिष खांडगे यांच्याकडे सुपूर्द करताना आमदार शेळके बोलत होते.

तळेगाव स्टेशन येथील मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे कार्यालय मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे होते.यावेळी सभापती बाबुराव वायकर, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, शहर महिला राष्ट्रवादी  अध्यक्षा सुनिता काळोखे, शहर विद्यार्थी राष्ट्रवादी अध्यक्ष अक्षय दाभाडे ,सुभाष जाधव , नगरसेवक संतोष भेगडे  अरुण माने,मंगल भेगडे सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून प्रतिकारशक्ती वाढीसाठी कॅल्शियम व विटामिन डी3 टॅबलेट (Calcium and Vitamin D3 ) व रक्त वाढीसाठी  आयरान अँड फोलिक ऍसिड टॅबलेट(Iron and Folic Acid ) या सुमारे चार लाख गोळ्या तळेगावकरा साठी आमदार सुनिल शेळके व सभापती बाबुराव वायकर यांचे हस्ते देण्यात आल्या.

      यावेळी बाबुराव वायकर म्हणाले मावळ तालुक्यामध्ये 15लाख गोळ्यांचं वाटप करण्यात येणार आहे.यावेळी आमदार शेळके म्हणाले कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव वाढत असताना तो थांबवण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाच्या  माझे कुटुंब  माझी जबाबदारी  या उपक्रमास  नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल  समाधान व्यक्त केले. तळेगाव मध्ये नगरपरिषदेकडून covid-19 सेंटर उभारून खर्च करण्यापेक्षा ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, पी पी किट, हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर आदी बाबीसाठी खर्च केल्यास निश्चित त्याचा फायदा सर्व सामान्य जनतेला होईल.महात्मा फुले योजनेसाठी रुग्णालयामध्ये नागरिकांना सुविधा प्राप्त होत नाही. त्या सुविधा संबंधित रुग्णालयाने लाभार्थी नागरिकास प्राप्त करून द्याव्यात.असे आव्हान शेळके यांनी केले.

स्वागत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गणेश काकडे यांनी केले. आभार युवा अध्यक्ष आशिष खांडगे यांनी केले.