Bhosari News : ’युवकांना उद्योग उभारून देण्यासाठी प्रयत्न’

Bhosari News : ’युवकांना उद्योग उभारून देण्यासाठी प्रयत्न’
  Pckhabar- देश आणि समाजाची प्रगती करायची असेल तर  युवा आणि युवतींना वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रशिक्षण देऊन त्या मार्फत छोटे उद्योग उभारून बेरोजगारीवर मात करण्यासाठी दुर्गा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दुर्गा भोर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना आल्या आहेत या योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहचवून राज्यातअनेक भागात महिला उद्योगांचे क्लस्टर उभारण्यास प्रयत्न केले जातील. यामध्ये विविध प्रकारच्या उद्योग व्यवसायांचा समावेश असेल. परंतु ग्रामीण भागात पाहिजे तेवढी त्याची जागृती झालेली नाही. ग्रामीण महिला सक्षम झाल्या तर नक्कीच प्रगती करू शकतात ग्रामीण भागात शेतीवर आधारित अनेक फूड उद्योग निर्माण केले जाऊ शकतात. त्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. महिला बचत गट कार्यरत असले तरी ते पुरेसे नाही. आणि त्याला पुरेशी विक्री व्यवस्था सुद्धा निर्माण झालेली नाही. त्यामुळे अनेक बचत गट निर्माण झाले तरी त्यांना कामाच्या संधी प्राप्त झालेले नाहीत.
राज्यातील युवक-युवतींना शैक्षणिक क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात पुढे आणण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे तंत्र शिक्षण घेऊन त्यांचा विकास घडविण्याचा एक प्रयत्न करण्यात येणार आह. अनेक क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम महिला मेळावे या अंतर्गत घेतले जातील. दिव्यांग महिलांना कशाप्रकारे रोजगार निर्मिती करता येईल याकडे सुद्धा विशेष लक्ष देण्यात येईल, असेही दुर्गा भोर म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *