तृतीयपंथीयांना निमलष्करी दलात घेण्यासंदर्भात सरकारकडून चाचपणी

ही बातमी शेअर करा.

नवी दिल्ली | लष्कर आणि निमलष्करी दलात तृतीयपंथीय व्यक्तींना लष्कराच्या अधिकारी पदावर नियुक्त करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं विचारणा केली आहे. केंद्र सरकारनं देशातील निमलष्करी दलांना याविषयी भूमिका मांडण्यास सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयानं 1 जुलै रोजी यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. केंद्रीय निमलष्करी दलांमधील सहाय्यक कमांडट पदासाठीच्या परीक्षेच्या नियमात महिला, पुरुष व तृतीय पंथीयांचा समावेश करण्यासंदर्भात अभिप्राय मागवले होते. त्यावर निमलष्करी दलांकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्यानं गृह मंत्रालयानं पुन्हा स्मरण करून दिलं आहे.


ही बातमी शेअर करा.